Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा, म्हणाले…

210

पेट्रोलच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. अशातच नितीन गडकरीं यांनी पेट्रोलची किंमत देशात १५ रुपये प्रति लिटर होऊ शकते असा दावा केला आहे. राजस्थानमधल्या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले, जे चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या देशातल्या मुख्य शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४ ते १०७ रुपये प्रति लिटर आहे.

नेमके काय म्हणाले नितीन गडकरी?

देशात पेट्रोल १५ रुपये प्रति लिटर होणार असल्याचा दावा करत नितीन गडकरी म्हणाले, “६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीही वापरता येऊ शकतो. शेतकरी हा आपल्या देशाचा फक्त अन्नदाताच नाही तर उर्जादाताही होईल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहने बाजारात लाँच करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर ही वाहने चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होईल.”

नितीन गडकरींनी राजस्थानातील प्रतापगढ या ठिकाणी ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित केले. भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन उसापासून इथेनॉलची निर्मिती करणे हे आहे. भारतात इंधनाची आयात कमी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असेही गडकरींनी म्हटले आहे.

(हेही वाचा Supriya Sule : अजित पवारांसोबत थेट संघर्ष होणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.