Sharad Pawar : आयोगात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा पवारांचा इशारा

232
Sharad Pawar : आयोगात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा पवारांचा इशारा
Sharad Pawar : आयोगात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा पवारांचा इशारा

वंदना बर्वे

आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपण न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत ११ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपण न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

(हेही वाचा – विद्यापीठाने परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करावेत – चंद्रकांत पाटील)

दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार पुढे म्हणाले की, विचारधारा सोडून जे लोक बाहेर पडले आहेत. त्यांचा सर्व कार्यकारिणीने विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.