DigiLocker : डिजीलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायला त्रास होतोय, मग या सोप्या पद्धती जाणून घ्या

262
DigiLocker : डिजीलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायला त्रास होतोय, मग या सोप्या पद्धती जाणून घ्या
DigiLocker : डिजीलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायला त्रास होतोय, मग या सोप्या पद्धती जाणून घ्या

हल्लीचे युग हे आधुनिक युग म्हणून ओळखले जाते. या युगात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आपल्या तंत्रज्ञानात कितीतरी बदल झालेले आपण पहिलेच असेल. एवढेच नव्हे तर आजतागायत या तंत्रज्ञानाच्या युगात दररोज नवनवीन बदल घडून येताना दिसतात. त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे डिजीलॉकर. डिजीलॉकर म्हणजे डिजिटल तिजोरी. या तिजोरीमध्ये तुम्ही तुमची महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेऊ शकता. एवढेच नाही तर ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातात.

डिजीलॉकर हे एक क्लाउड स्टोअरेज सर्व्हिस आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन म्हणजेच DIC च्या अंतर्गत मिनिस्टरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटीच्या द्वारे डिजीलॉकर ही क्लाउड स्टोअरेज सर्व्हिस दिली जाते. हे डिजीलॉकर तुमची ओळख तपासण्यासाठी आधारकार्डचा वापर करते. या डिजीलॉकरमध्ये तुम्ही तुमची महत्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सांभाळून ठेऊ शकता तसेच त्यांचा वापरही करू शकता. पण या डिजिटल कागदपत्रांचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट असायलाच हवे. ही डिजिटल कागदपत्रे तुमच्या मुख्य कागदपत्रांप्रमाणेच मानली जातात. त्या कागदपत्रांचा वापर तुम्ही रेल्वे, ट्रॅफिक पोलीस तसेच पासपोर्टसुविधेसाठीही करू शकता. तर या डिजिटल लॉकरमध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी केले आश्वस्त)

त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डिजी लॉकरच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यावर साईन अप बटणावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरायला सांगितली जाईल. ती माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला एक सहा अंकांचा पासवर्ड सेट करावा लागेल. मग तुम्ही सबमिट च्या बटणावर क्लिक करा. एवढे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबरवर एक ओटीपी येतो तो ओटीपी टाकून तुम्ही तुमचे अकाऊंट डिजीलॉकर मध्ये तयार करू शकता. तुमचे अकाऊंट तयार झाल्यावर तुम्हाला डिजीलॉकरचे होमपेज दिसते. इथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स नावाचे बटण दिसेल. या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये असलेली कागदपत्रे या डिजिटल लॉकरमध्ये सहजपणे अपलोड करू शकता. ही कागदपत्रे प्रत्येकी दहा एमबी एवढ्या साईजमध्ये पीडीएफ, जेपीइजी आणि पीएनजी फाईल्समध्ये असू शकतात. अशाप्रकारे डिजिटल लॉकरमध्ये सांभाळून ठेवलेली महत्वाची कागदपत्रे तुम्ही तुमच्या सोयीनुसार अनेक ठिकाणी वापरू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.