सोशल मीडिया ऍप्स आपल्या युजर्सना चांगल्या सुविधा देण्यासाठी रोज नवनवीन फीचर्स अपडेट्स करत आहेत. हल्लीच मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरवर आपल्याला तीन तासांपेक्षा जास्त मोठा व्हिडीओ पोस्ट करणे आणि पाहणे शक्य होणार आहे. म्हणजेच जवळजवळ एक चित्रपट अपलोड करता येईल इतकी क्षमता या फीचरमुळे प्राप्त होणार आहे. हल्लीच ट्विटरवरून मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी अमेरिकन विनोदवीर आणि पॉडकास्टर थिओ वॉन यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे.
या बातमीमुळे ट्विटर वापरकर्त्यांमुळे आनंदाचे वातावरण आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक क्रांतिकारी पावले उचलली आहेत. नवा बदल घडवण्यात मस्त यांचा नेहमी आघाडीवर असतात. झालं असं की अमेरिकेचे विनोदवीर आणि पॉडकास्टर थियो वॉन यांनी एलन मस्क यांना ट्विट करत सूचना दिली की, “टामस्टॅम्ससह तासांपेक्षा जास्त मोठा असा पॉडकास्ट व्हिडिओ अपलोड करणं योग्य ठरेल.’
आता गप्प बसतील ते मस्क कसले? त्यांनी लगेच वॉन यांना उत्तर दिलं की, “लवकरच…” याचा अर्थ लवकरच ट्विटरवर ३ तासांएवढा मोठा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करता येणार आहे. वॉन यांनी यासाठी एलन मस्क यांचे आभार मानत म्हटले, “धन्यवाद एलन! तुम्ही जेव्हा ट्विटरवर पॉडकास्ट आणण्याचा विचार कराल, तेव्हा मला नक्कीच कळवा. मला मदत करायला आनंद होईल.”
हे ट्विट वाचून अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी एलन मस्क यांची स्तुती केली आहे. अनेक लोक आता या नव्या फीचरची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. त्याचबरोबर ट्विटरमध्ये आणखी कोणकोणते बदल घडणार आहेत, हे जाणून घेण्यास देखील लोक उत्सुक आहेत.
Join Our WhatsApp Community