राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले. मात्र शरद पवार यांनी आपला धुळे आणि जळगावचा दौरा केला आहे. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे आपण कुठलाही दौरा करणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. मात्र नाशिक येथील येवल्याची त्यांची उद्याची (८ जुलै) सभा होणार आहे.
अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार राज्यभर फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी आणि मेळावे करून आपली बाजू मांडणार आहेत. याची सुरुवात शनिवारी (८ जुलै) नाशिक येवला माध्यम होणार आहे. येवला येथे सायंकाळी चार वाजता होणारी ही सभा ऐतिहासिक असल्याचे म्हंटले जात आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांना कोणताही दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली)
शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार?, भुजबळ आणि अजित पवारांचा शरद पवार कसा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community