पंकजा मुंडे कॉंग्रसमध्ये जाणार अशा चर्चा मागील काही दिवासांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत होते. या सर्व चर्चांवर अखेर पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. या वेळी त्यांनी आपण पक्ष सोडत नसल्याचं स्पष्ट केले आहे.
माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?
मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?” असा सवाल उपस्थित करत “माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. “मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून मी सुट्टी घेत आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांना कोणताही दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली)
मी भाजप सोडून कुठल्याच पक्षात जाणार नाही
पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने जोर धरल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजप सोडून कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचं सांगितलं. “मी नाराज आहे आणि पक्षाच्या बाहेर जाणार अशी चर्चा होते. मी भाजपमध्येच राहणार आहे. मी राहुल आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दाखवली. ही बातमी दाखवणाऱ्या संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. जेव्हा-जेव्हा तिकीट दिलं नाही, तेव्हाही मी प्रतिक्रिया दिली नाही. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न का उपस्थित करता,” असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला.
माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार
माझे करियर २० वर्षांचे आहे. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचे माझ्यावर संस्कार नाही. दरवेळी पंकजा मुंडे यांचे नाव येते व मला तिथे स्थान मिळत नाही. मी कधीही टिप्पणी केली नाही. भागवत कराड यांना संधी दिली, त्यानंतर मीच त्यांच्या यात्रेला भगवा झेंडा दाखवला. मला दोनवेळा फॉर्म भरायला सांगितला. पण नंतर तो भरू नका असे सांगण्यात आले. पण मी जो ‘आपकी आज्ञा’ म्हणत पक्षाचे आदेश ऐकले, असेही त्यांनी म्हंटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community