राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानाला निवडणूक आयोगाची मान्यता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला ताबा मिळवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सफल होणार नाही असेही सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षावर ताबा मिळविण्याची लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत बोलाविली होती. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी जितेंद्र आव्हाड दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेला निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त आहे. यामुळे राकाला ताब्यात घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. शिवसेनेच्या संविधानाला निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त नव्हती. यामुळे उद्धव ठाकरे यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आणि शिवसेना हातातून गेली. मात्र राष्ट्रवादी बाबत असे नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानाला निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त आहे.
(हेही वाचा – अखेर डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे – फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश)
राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे याची दर तीन वर्षांनी निवडणूक होत असते आणि निवडलेल्या अध्यक्ष ची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली जाते. यामुळे पक्ष हातातून जाण्याची भीती आम्हाला नाही असेही जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले. जितेंद्र आव्हाड, ब्रिजमोहन श्रीवास्तव निवडणूक आयोगात किल्ला लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील पक्षावर ताबा मिळविण्याची लढाई निवडणूक आयोगात पोहचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड आणि ब्रिज मोहन श्रीवास्तव यांना निवडणूक आयोगामध्ये राकाची बाजू मांडण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community