Mani Shankar Aiyar : काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ

187
Mani Shankar Aiyar : काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ
Mani Shankar Aiyar : काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांची मुलगी यामिनी अय्यर यांच्या दिल्ली येथील एनजीओचा परवाना गृह मंत्रालयाने रद्द केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गृह मंत्रालयाने ही कारवाई केली असून नियमांचे पालन न केल्यामुळे हा परवाना रद्य करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च थिंक टॅंक, असे या एनजीओचे नाव आहे. तसेच एफसीआरए लायसेंस देखील निलंबीत करण्यात आले आहे, हे विशेष. काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांची मुलगी यामिनी अय्यर या एनजीओच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत.

गेल्या वर्षीं सप्टेंबर मध्ये आयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सीपीआर आणि ऑक्सफेम इंडीया चा तपास सुरु करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीपीआरचे विदेशी अनुदान अधिनियम अंतर्गत एफसीआरए, हा परवाना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्य करण्यात आला आहे.

(हेही वाचा – पंकजा मुंडे केंद्रात मंत्री होणार; फडणवीसांनी घडवून आणले पंकजा-धनंजय यांच्यात मनोमिलन?)

दरम्यान सीपीआरने म्हटले आहे की, आमची एनजीओ ही एक गैर लाभकारी आणि लोकहितवादी स्वतंत्र संस्थ आहे. जी संशोधन करण्यासाठी समर्पित आहे. यामुळे उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे. देशाच्या विकासासाठी लाभदायक योजना बनविणे आणि जीवनाला प्रभावित करणाऱ्या विषयावर महत्वपुर्ण योगदान देण्याचे कार्य ही एनजीओ करीत असते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.