आजचा नवा भारत हा तरूण भारत आहे, तो उर्जेने परिपूर्ण आहे. २१ व्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात हा सुवर्णकाल आपल्यासमोर आला आहे. या सुवर्णकालातील प्रत्येक सेकंदाचा आपल्याला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. वेगवान विकासाच्या कोणत्याही शक्यतेपासून देशाचा कोणताही कोपरा मागे राहू नये, असे आवाहन तरुण पिढीला पंतप्रधान मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तेलंगणात पोहोचले. त्यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात पूजा केली. यानंतर गाईंना चारादेखील खाऊ घातला. यानंतर मोदींनी ६१०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये महामार्गापासून रेल्वेपर्यंतच्या प्रकल्पांचा समावेश आहे. वारंगलमध्ये एका जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले, तेलंगणा सरकारने नेहमीच केंद्र सरकारला शिव्या दिल्या आहेत. ते जनतेची फसवणूक करतात. केसीआर म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार. वारंगलमध्ये एका जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले, तेलंगणा सरकारने नेहमीच केंद्र सरकारला शिव्या दिल्या आहेत. ते जनतेची फसवणूक करतात. केसीआर म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार.
नरेंद्र मोदी यांनी वारंगलमधील हणमकोंडा येथील कॉलेज ग्राउंडवर जाहीर सभेला संबोधित केले. त्या वेळी पंतप्रधान म्हणाले, तेलंगणा सरकारने फक्त ४ कामे केली आहेत. मोदी आणि केंद्र सरकारला सकाळ संध्याकाळ शिव्या घालणे. एका कुटुंबाला सत्तेचे केंद्र बनवणे. दुसरे म्हणजे, स्वतःला तेलंगणाचे मालक सिद्ध करणे. तिसरे तेलंगणाच्या आर्थिक विकासाला खिंडार पाडणे आणि चौथे तेलंगणाला भ्रष्टाचारात बुडवणे.
(हेही वाचा – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे विकासाचे ‘त्रिशूळ’ – देवेंद्र फडणवीस)
पंतप्रधान म्हणाले, आज मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून वारंगलमध्ये आलो आहे. हा परिसर जनसंघाच्या काळापासून आपल्या विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. तेलंगणाचा विकास झाला पाहिजे, हे भाजपचे उद्दिष्ट आहे. तेलंगणाने भारताचा विकास करावा.जगामध्ये भारताच्या वाढत्या उंचीबाबत पंतप्रधान म्हणाले, आज संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहे. त्यावेळी विकसित भारताबद्दल खूप उत्साह आहे. अशावेळी तेलंगणासमोर संधी आहेत. तेलुगू लोकांच्या ताकदीने भारताची ताकद नेहमीच वाढवली आहे. आज जेव्हा भारत जगातील ५ वी मोठी आर्थिक शक्ती बनला आहे, तेव्हा त्यातही तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community