आज म्हणजेच शनिवार ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकाच मंचावर आले.
या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना शासन आपल्या दारी योजनेचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.
मी गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमासाठी एवढी मोठी गर्दी पाहिली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलतांना, आज या कार्यक्रमात ११ लाखांपैकी सडे सहा ते पावणे सात लोकांची लाभार्थी म्हणून निवड ही रेकॉर्डब्रेक नोंद आहे. नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीचे कौतुक केले, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या वर्षपूर्ती नंतरचा शासन आपल्या दारी हा पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीमध्ये होत आहे याचा मला आनंद आहे.
गडचिरोली येथे आयोजित’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/naPUv5iGk6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2023
(हेही वाचा – फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसचा आमदार मातोश्रीवर, मविआत कुरघोडी?
या भागात सरकारच्या माध्यमातून अनेक विधायक कामांना गती माळी आहे. शासन आपल्या दारी ही संकल्पनाच मुळात सर्वसामान्य माणसांसाठी आहे. आज आपण या योजनेअंतर्गत साडे सतराशे मुलींना सायकल वाटप केली तर ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यंची जवळपास ६०१ कोटींचं लाभ मिळण्याची तरतूद सरकारने केली आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडायची होती म्हणून आम्ही ही योजना तुमच्या समोर आणली. या योजनेसोबतच शासनाने रोजगार मेळावा, महिला सक्षमीकरण या योजनेकडे देखील सरकारचे प्राधान्य आहे. आमचं सरकार हे रोजगार देणारं सरकार आहे. पालकमंत्री म्हणून मी स्वतः गडचिरोली हा जिल्हा मागून घेतला होता. शासकीय लाभासोबतच या भागातील नक्षलवाद जवळ जवळ संपवण्याचं काम सरकार करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community