पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ६१०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

165
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ६१०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार ८ जुलै रोजी तेलंगणा मधील वारंगल येथे ६,१०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध महत्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या विकासकामांमध्ये ५५०० कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या १७६ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि काझीपेठ येथे ५०० कोटी रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उत्पादन केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी भद्रकाली मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणा हे तुलनेने नवीन राज्य असले आणि या राज्याची स्थापना होऊन केवळ ९ वर्षे झाली असली तरी भारताच्या इतिहासातील तेलंगणाचे आणि येथील जनतेचे योगदान उल्लेखनीय आहे. तेलगू लोकांच्या क्षमतांमुळे देशाच्या क्षमतेत नेहमीच वृद्धी झाली आहे. भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्यात तेलंगणाचे योगदान महत्वाचे आहे असे सांगून भारताकडे जग गुंतवणुकीचे विश्वासार्ह स्थान म्हणून बघत असल्याने संधींमध्ये अमाप वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – आमचं सरकार हे रोजगार देणारं सरकार आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

आजचा नवीन तरुण भारत उर्जेने भरलेला आहे असे सांगून २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात आलेल्या या सुवर्णकाळाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या जलद गतीने होणाऱ्या विकासात भारताचा कोणताही भाग दुर्लक्षित राहता कामा नये, यावर त्यांनी भर दिला. गेल्या नऊ वर्षात तेलंगणा मध्ये पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा मजबूत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या 6 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांसाठी त्यांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदन केले.

यावेळी पायाभरणी झालेल्या नागपूर- विजयवाडा मार्गिकेच्या मंचेरियल- वारंगळ कॉरिडॉरविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा कॉरिडॉर तेलंगणाला महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशशी आधुनिक स्वरूपातील कनेक्टिव्हिटी प्रदान करेल तसेच यामुळे मंचेरियल आणि वारंगळ यामधील अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. हा प्रदेश म्हणजे अनेक आदिवासी समुदायांचे घर असून ते कित्येक काळासाठी दुर्लक्षित राहिले आहे. हा कॉरिडॉर राज्याला बहुविध संपर्कयंत्रणा प्रदान करेल आणि करीमनगर- वारंगळ रकल्पाचे चार मार्गिकांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पामुळे हैदराबाद-वारंगळ औद्योगिक मार्गिका, काकतीया मेगा टेक्स्टाईल पार्क आणि वारंगळ येथे एक एसईझेड यांच्या सोबतच्या कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.