गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. सर्व स्तरातून या सिनेमावर, दिग्दर्शक आणि लेखकावर टीका होत होती. आदिपुरुष चित्रपटातून मांडलेले रामायण, थिल्लर संवाद यामुळे प्रेक्षकांनी नाराज होऊन ही टीका केली होती. मात्र चित्रपटाच्या संपूर्ण टीमने विशेषतः लेखकाने कधीच आपली चूक मान्य केली नाही. मात्र चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता त्यांनी सिनेमातील काही संवाद बदलले. तरीही त्यांनी आपली चूक मान्य केली नाही. अखेर चित्रपट प्रदर्शनाच्या २३ दिवसांनंतर लेखक मनोज मुंतशीर यांना उपरती झाली असून त्यांनी अखेर प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भगवान श्री रामाचे भक्त, संत आणि प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.
(हेही वाचा – जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज : डॉ. मनसुख मांडवीय)
नेमकं काय म्हणाले मनोज मुंतशीर
“आदिपुरुष चित्रपटाद्वारे मी संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या आहेत हे मी मान्य करतो. मी माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय संत आणि भगवान श्री रामाच्या भक्तांची माफी मागतो. भगवान हनुमानाचे आशीर्वाद माझ्यावर असोत. भगवान सदैव आम्हाला पवित्र सनातनची आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community