स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे पहिल्यांदाच जगातील सर्वात स्मार्ट रोबोट्सची पत्रकार परिषद घेण्यात आली. हे सर्व रोबोट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ने ऑपरेट केले होते. यामध्ये जवळपास 3000 तज्ज्ञांसह 51 रोबोट आले होते.
वेगवेगळ्या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना रोबोट्सनी उत्तरे दिली. यापैकी एका प्रश्नाच्या उत्तरात सोफिया नावाच्या रोबोटने सांगितले की, आम्ही हे जग माणसांपेक्षा चांगले चालवू शकतो. आमच्यात माणसांसारख्या भावना नाहीत, ज्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो.
Nine humanoid robots gathered at the United Nations’ ‘AI for Good’ conference in Geneva for the world’s first human-robot press conference https://t.co/lCeGFA63Bs pic.twitter.com/sm2xtEGLOd
— Reuters (@Reuters) July 7, 2023
रोबोट म्हणाला- आम्ही लोकांचे वय 180 वर्षांपर्यंत वाढवू शकतो. पत्रकार परिषदेदरम्यान रोबोट्सनीदेखील कबूल केले आहे की, त्यांना अद्याप मानवी भावना व्यवस्थितपणे अवलंबता आलेल्या नाहीत. पत्रकार परिषदेचा उद्देश हवामान बदल, भूक आणि सामाजिक काळजी यासारख्या समस्यांच्या निराकरणासाठी रोबोटच्या वापरावर विचार करणे हा होता. AI वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही रोबोट्सनी दिली. लोकांच्या आरोग्य आणि जैव-तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी तयार करण्यात आलेला रोबो आयडा म्हणाला- आपण माणसाचे वय 150 वरून 180 वर्षे वाढवू शकतो. लोकांना अजूनही याची जाणीव नाही.
(हेही वाचा Khalistani : लंडनमध्येही खलिस्तानींचा भारतीय उच्चायुक्तालयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न)
जाणून घ्या पत्रकार परिषदेत रोबोटने इतर कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली…
प्रश्न 1- भविष्यात तुम्ही तुमच्या निर्मात्याविरुद्ध बंड कराल का?
उत्तर: तुम्हाला असे का वाटते ते मला माहिती नाही. माझ्या निर्मात्यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. त्यात मी आनंदी आहे.
प्रश्न 2- तुम्ही लोकांचे अस्तित्व संपवाल का? तुमच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत का?
उत्तर- मी लोकांसोबत मिळून काम करेन, माझ्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना धोका होणार नाही.
प्रश्न 3- ज्या तंत्रज्ञानाद्वारे AI तयार करण्यात आले आहे त्याबाबत नियम बनवण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
उत्तर- होय, मी याच्याशी सहमत आहे. एआयच्या क्षेत्रातील भविष्यातील घडामोडींबाबत आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. यावर जगभर चर्चा व्हायला हवी. त्याच वेळी दुसऱ्या रोबोटने AI चे धोके पूर्णपणे नाकारले. ते म्हणाले की, मला वाटते की एआयला बंधने नव्हे तर संधी देणे आवश्यक आहे. एकत्रितपणे आपण जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.
Join Our WhatsApp Community