Nitesh Rane : ‘मातोश्री’वरील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी – नितेश राणे

167

श्रीधर पाटणकरांची एक महत्त्वाची केस जी ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडे प्रलंबित आहे, त्याची चौकशी पंतप्रधानांनी केली पाहिजे, असे वक्तव्य भाजप आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. अन्य भ्रष्टाचाराविषयी बोलण्याऐवजी मातोश्रावरील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असा खोचक टोला नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.

दरम्यान नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत एक अतिशय योग्य मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली, ती म्हणजे भ्रष्टाचार केलेल्या सगळ्या चोकशा पंतप्रधानांनी केल्या पाहिजेत. हीच मागणी मीही पंतप्रधानांकडे करेन की मुंबईची लूट करणार्‍या आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणार्‍यांची चौकशी व्हावी.

(हेही वाचा Robots : जीनिव्हात 51 रोबोट्सने घेतली पत्रकार परिषद; पत्रकारांच्या प्रश्नांना दिली थेट उत्तरे )

पाटणकरांसाठी ठाकरेंनी खूप प्रयत्न केले

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, अन्य भ्रष्टाचाराविषयी बोलण्याऐवजी श्रीधर पाटणकराला वाचवण्यासाठी कितीदा तुझ्या मालकाने दिल्लीच्या फेर्‍या मारल्या? कितीदा पंतप्रधानांना विनवण्या केल्या? जी मेहनत आणि राजकीय ताकद उद्धव ठाकरेंनी पाटणकरला वाचवण्यासाठी वापरली ती कधीच कुठल्या शिवसैनिकासाठी वापरली नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वःच्या मेहुण्यापलीकडे जाऊन कधीच कोणत्या शिवसैनिकासाठी पंतप्रधानांची भेट घेतली नाही. माझ्या मेहुण्याला वाचवा, पाहिजे तर मी भाजपमध्ये येतो, असेही उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये जाऊन सांगितले होते, असे नितेश राणे म्हणाले.

अटकेची कारवाई करा

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर पडलेले छापे तसेच पाटणकरांकडे मोठ्या प्रमाणात असलेला काळा पैसा याचीही चौकशी होऊन अटकेची कारवाई व्हावी. महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार, कोविड सेंटर संदर्भात संजय राऊतांचा उजवा हात असणार्‍या सुधीर पाटकर यांची सुरु असलेली चौकशी या सगळ्या संदर्भातही पंतप्रधानांनी चौकशी करावी अशी मी विनंती करतो, असे नितेश राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.