अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला कधीही ठरला नव्हता. जेवढ्या जाहीर सभा व्हायच्या, त्या सर्व जाहीर सभेचे व्हिडिओ आहेत. विश्व गौरव नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी वारंवार सांगितलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. मात्र, राष्ट्रवादीसोबत यांची बैठक झाली आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की, भाजपच्या कमी जागा आहेत, तर तुम्ही मुख्यमंत्री पदाची मागणी करा आणि तेच यांनी केलं, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 120 च्या वर जागा येणार नाही. हे लक्षात आलं त्यानंतर यांच्या मनात बेइमानी सुरू झाली आणि यांची त्यावर चर्चा सुरू झाली. त्या ठिकाणी अमित शाह आणि चार भिंती याच्याशिवाय कोणीच नव्हते. अमित शाहांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं, आम्ही कुठलाही शब्द दिला नाही. अशी सवय राजकीय क्षेत्रात लागली, तर इतर राज्यात सुद्धा तेच होईल. हे लोकशाहीला धरून असू शकत नाही. ज्यांनी 35 -35 वर्ष रक्ताचे पाणी केलं, शिवसेनेचा झेंडा हाती घेतला ते का तुम्हाला टाटा बाय-बाय करून गेले? एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन निघून गेले याला भाजप दोषी नाही तर तुमचा स्वभाव तसा आहे, तुमच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. नीलम गाऱ्हेंनी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेक जण अजूनही संपर्कात आहे. आमच्याकडे आता जागा नाही, आम्ही घेत नाही यांच्यासोबत राहायला कुणीही तयार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा Robots : जीनिव्हात 51 रोबोट्सने घेतली पत्रकार परिषद; पत्रकारांच्या प्रश्नांना दिली थेट उत्तरे )
Join Our WhatsApp Community