हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांचे WhatsApp चॅट्स उघड; एटीएसकडून आरोपपत्र दाखल

158
हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांचे WhatsApp चॅट्स उघड; एटीएसकडून आरोपपत्र दाखल

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर निवृत्तीला सहा महिने बाकी असतांना (DRDO) ते हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने कुरुलकर यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

अशातच शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात कुरुलकर यांच्याविरोधात असंख्य आरोप लावले आहेत. याबाबतचं व्हॉट्सॲप चॅट आता समोर आले आहेत. ३० जून रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात एटीएसने आरोपपत्र दाखल केलं आहे.

(हेही वाचा – विदर्भाच्या विकासाने ‘टेक ऑफ’ घेतला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

डॉ. प्रदीप कुरुलकरांनी व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे देशाच्या संरक्षणाबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचं एटीएसच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. कुरुलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली, गोपनीय प्रकल्प, ड्रोन आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या कामाचं वेळापत्रक आदींची माहिती पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. संबंधित पाकिस्तानी एजंटचं नाव ‘झरदास गुप्ता’ असल्याचं समजलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपी कुरुलकर यांनी डीआरडीओच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या फोनमध्ये त्यांच्या कामाशी संबंधित गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे संग्रहित केली होती.

कुरुलकर आणि ‘झारा’ यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये ‘ब्रह्मोस’, अग्नी-६, रुस्तम (मध्यम पल्ल्याचं मानवरहित हवाई क्षेपणास्त्र), ‘सरफेस टू एअर मिसाईल्स’ (एसएएम- जमिनीवरून हवेत हल्ला करणारं क्षेपणास्त्र), मानवरहित ‘कॉम्बॅट एअर व्हेइकल्स’ (यूसीएव्ही) , DRDO चा ड्रोन प्रकल्प अशा विविध संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण झाली आहे. याशिवाय क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्ट, मेटियर क्षेपणास्त्र, राफेल, आकाश आणि ॲस्ट्रा क्षेपणास्त्रबाबतची माहिती लीक करण्यात आली आहे. तसेच एका खासगी भारतीय संरक्षण कंपनीच्या कार्यकारिणीचाही उल्लेख चॅटींगमध्ये करण्यात आला आहे.

पाकिस्तानी एजंटने कुरुलकर यांना व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्यांच्या फोनमध्ये “bingechat.net” आणि “cloudchat.net” असे ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं होतं, हेही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.