World Cup Qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंका विजयी

143
World Cup Qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंका विजयी

झिम्बाब्वे येथे सुरु असलेल्या क्रिकेट पात्रता स्पर्धेत (World Cup Qualifier 2023) श्रीलंकेने नेदरलँड्वर एकतर्फी विजय मिळवला. काल म्हणजेच रविवार ९ जुलै रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्चा तब्बल १२८ धावांनी पराभव केला. या सामन्यामुळे या संघांच्या विश्वचषकातील स्थानांवर कोणताही परिणाम झालेला नाही. श्रीलंका आणि नेदरलँड्सने आगामी विश्वचषकात आधीच आपले स्थान निश्चित केले होते. या दोन्ही संघाने सुपर सिक्समध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले आहे.

विश्वचषक पात्रता फेरी या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला. अमेरिका, नेपाळ, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचे संघ गट फेरीतून बाहेर पडले. यानंतर सुपरसिक्समध्ये चार संघांना बाहेरचा रस्ता पकडावा लागला. दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या वेस्ट इंडिज व्यतिरिक्त झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि ओमानचे संघ देखील विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत.

(हेही वाचा – हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांचे WhatsApp चॅट्स उघड; एटीएसकडून आरोपपत्र दाखल)

नेदरलँड्सने श्रीलंकेला २३३ धावांत गुंडाळले

या सामन्यात टॉस जिंकून नेदरलँडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांच्या संघाने श्रीलंकेला ४७.५ षटकांत २३३ धावांत गुंडाळले. लंकन संघाकडून सहान आर्चिगेने ५७ धावा केल्या. चरित अस्लंकाने ३६, कुशल मेंडिन्सने ४३, वानिंदू हसरंगाने २९ आणि पाथुम निसांकाने २३ धावांचे योगदान दिले. सदीरा समरविक्रमाने १९ आणि महिष तीक्षानाने १३ धावा केल्या.

श्रीलंकेच्या फिरकीपटूंची कमाल

हे २३४ धावांचे लक्ष्य पाहता नेदरलँडचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र श्रीलंकेच्या फिरकीपटूं कमाल केली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंपुढे नेदरलँडच्या फलंदाजाकडे उत्तर नव्हते. नेदरलँडचा संपूर्ण संघ १९५ धावांवर गारद झाला. नेदरलँडकडून मॅक्स ओडाडने ३३, लोगन व्हॅन बीकने २० आणि विक्रमजीत सिंगने १३ धावा केल्या. या तिघांशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. महिष तीक्षानाने चार, दिलशान मदुशंकाने तीन आणि वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.