जगात एकही व्यक्ती असा सापडणार नाही ज्याला चहा प्रिय नाही. भारतात पाण्याच्या नंतर प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा. बहुतेक वेळा चहाला गाळण्यासाठी स्टील किंवा प्लॅस्टिकच्या गाळणीचा वापर केला जातो. सतत वापरामुळे गाळणी काळी पडते आणि चहा गाळण्यास वेळ लागतो. गाळणीला लहान लहान छिद्र असल्याने साफ करण्यास खूप त्रास होतो. अशातच अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर करुन चहाची गाळणी सहजरित्या साफ करु शकता.
या गोष्टींच्या मदतीने स्टीलची गाळणी करा साफ
बेकिंग पावडर – बेकिंग पावडरला नैसर्गिक क्लीन्सर मानले जाते. जे हट्टी काळे डाग घालवण्यास मदत करते. गाळणीचा काळेपणा घालवण्यासाठी, एका पॅनमध्ये पाणी गरम करा, नंतर त्यात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. आता त्यात काळी पडलेली चहाची गाळणी त्या मिश्रणात बुडवून साधारण २ ते ३ तास राहू द्या. यामुळे डाग हलके होतील आणि मग तुम्ही डिशवॉश लिक्विडच्या मदतीने ते सहज स्वच्छ करू शकता.
(हेही वाचा Eknath Shinde : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितली पडद्यामागील कहाणी)
ब्लीच – एका लहान भांड्यात पाणी घाला आणि त्यात एक ते दोन चमचे ब्लीच मिसळा. आता या द्रावणात काळे डाग पडलेली चहाची गाळणी ठेवा आणि सुमारे २० मिनिटे तसेच राहुद्यात. आता स्वच्छ पाणी, ब्रश आणि डिशवॉशच्या मदतीने ते पूर्णपणे स्वच्छ करा
पांढरे व्हिनेगर – व्हाईट व्हिनेगरचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु तुम्ही त्याचा वापर तुम्ही स्टीलची गाळणी स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. एका भांड्यात पांढरा व्हिनेगर घ्या आणि नंतर त्यात डाग असलेली गाळणी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ब्रश आणि डिशवॉश लिक्विडच्या मदतीने स्वच्छ करा. येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.
Join Our WhatsApp Community