सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्डमिक्सचा वापर करण्यात येत असून आतापर्यंत ३२९ मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्ड्यात गेले आहे. मात्र, हे कोल्डमिक्स शास्त्रोक्तपणे खड्ड्यात भरले जात नसल्याने याद्वारे बुजवलेले खड्डे पावसाच्या किरकोळ सरीतही वाहून जात आहे. त्यामुळे आता पर्यंत टाकलेले सर्व कोल्डमिक्स हे अशाचप्रकारे वाहून गेल्याने तब्बल ३२९ मेट्रिक टन कोल्डमिक्स हे खड्ड्यात गेल्याचे स्पष्ट होते.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आजवर कोल्डमिक्स तंत्राचा वापर केला जायचा. परंतु मागील वर्षी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि यावर्षी रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर करत खड्डे भरण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने याही तंत्राद्वरे खड्डे बुजवले जात आहे. मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्डमिक्सचा वापर करण्यात येणार असल्याने २९०५ मेट्रिक टन कोल्डमिक्स तंत्राच्या मागणीच्या तुलनेत १४५० कोल्डमिक्स तंत्राचा पुरवठा २४ विभाग कार्यालयांना करण्यात आला.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलैपासून फ्रान्स दौऱ्यावर; ४५ हजार कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता)
त्यातील आजवर ३२९ मेट्रिक टनाच्या १३१६४ पिशव्यांमधील मटेरियलचा वापर करण्यात आला. कोल्डमिक्सचे एकूण उत्पादन हे १६१३ मेट्रिक टन झाले असून त्यातील १४५० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा झाल्याने महापालिकेकडे सुमारे १६४ कोल्डमिक्सचा साठा राखीव आहे. मात्र, यंदा रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर होत असल्याने कोल्डमिक्सचा वापर कमी होत आहे. परंतु हे मटेरियल पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याने या मटेरियलचा वापर करून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्यास त्याठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, असल्याची निदर्शनास येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community