बिनखात्याचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीला बसण्यास राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नकार दिल्यामुळे आज म्हणजेच मंगळवारी ११ जुलै रोजी होणारी कॅबिनेट बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
गेल्या मंगळवारी ४ जुलैला राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी बिनखात्याचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. परंतु, सलग दुसऱ्या कॅबिनेटमध्ये बिनखात्याचे मंत्री म्हणून बसण्यास हे नऊ मंत्री तयार नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रिपद?; उपसभापती पदासाठी ‘या’ नावाची चर्चा)
या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (१० जुलै) मध्यरात्री शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. मात्र, पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केल्याशिवाय खातेवाटप करू नका, या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम राहिल्याने खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही.
त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा आणि अधिवेशनाच्या किमान दोन-तीन दिवस आधी खातेवाटप जाहीर करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आणि ते बैठकीतून मार्गस्थ झाले, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community