महिलांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलात स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाला अधिक सक्षम बनविण्यासाठी निर्भया पथकाच्या ताफ्यात ४० चारचाकी आणि १८४ दुचाकीचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. नवीन वाहनांचा पथकात नव्याने समावेश होत असल्याने पथक अधिक कार्यक्षम बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त करून वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याच्या ठिकाणी निर्भयाचे पथक तात्काळ दाखल होऊन महिलांवरील गुन्ह्यावर रोख आणून गुन्हेगारांना अटक करण्यात येथे. ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. या पथकाला अधिक सक्षम बनविण्यासाठी राज्याच्या गृहखात्याकडून या पथकाच्या ताफ्यात चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी निर्भया पथकाच्या ताफ्यात ४० चारचाकी आणि १८४ दुचाकी वाहनाचा समावेश करण्यात आला.
(हेही वाचा – मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यात ३२९ मेट्रिक टन कोल्डमिक्स)
मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे निर्भया पथकाला देण्यात येणाऱ्या वाहनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती मुंबईचे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्भया पथकाच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. नवीन वाहनांचा पथकात नव्याने समावेश होत असल्याने पथक अधिक कार्यक्षम बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community