महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखेने ऐतिहासिक कामगिरी करत युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जागतिक स्पर्धेतील रिकर्व्ह गटात सोनेरी यश संपादन करणारा पार्थ भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 10 पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मनाली जात आहे. साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने 21 वर्षाखालील वयोगटात रिकर्व्ह प्रकारात कोरियाच्या खेळाडूला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला तिरंदाज ठरला. पार्थने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सोंग इंजूनला पाच सेटपर्यंत कडवी झुंज दिली. पार्थने सोंग इंजूनला 7 – 3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे पराभूत केलं.
(हेही वाचा – Heavy Rain : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत ५६ जणांचा मृत्यू)
अंतिम फेरीत पार्थने 5 – 3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (एकमद मध्यभागी निशाणा साधणे) निशाणे साधत पार्थने दमदार शेवट केला. पार्थच्या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पार्थ हा साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवाशी आहे. पार्थला वडिलांकडूनच नेमबाजीचे मार्गदर्शन मिळाले.
Parth Salunkhe’s PURE DETERMINATION. 👏
India has the new 2023 World Archery Youth Champion. 🇮🇳🇮🇳🇮🇳#WorldArchery pic.twitter.com/rTDPYDCDBA— World Archery (@worldarchery) July 9, 2023
आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पार्थ जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिले आहे. मिश्र दुहेरी गटात पार्थ आणि हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community