IND vs BAN 2nd T20I : बांगलादेश विरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ शंभरच्या आत गुंडाळला 

147

बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी पटापट विकेट्स घेतल्या. भारतीय संघ शंभर धावांच्या आत गुंडाळला.

स्मृती मानधना ( १३) व शेफाली ( १९) या दोघी फलकावर ३३ धावा असताना माघारी परतल्या. शेफालीची विकेट घेणाऱ्या सुल्ताना खातूनने पहिल्याच चेंडूवर हरमनप्रीतचा त्रिफळा उडवला. यास्तिका भाटीया ( ११), दीप्ती शर्मा ( १०) व अमनज्योत कौर ( १४) वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताला ८ बाद ९५ धावांवर समाधान मानावे लागले. खातूनने ३, फहिमा खातूनने २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-२०त  गोल्डन डकवर बाद होणारी हरमनप्रीत ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. यापूर्वी २०२२ मध्ये किरण नरगिरे गोल्डन डकवर बाद झाली होती.  ट्वेंटी-२० सर्वाधिक ३ वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधाराचा नकोसा विक्रम हरमनप्रीतच्या नावावर नोंदवला गेलाय. झुलन गोस्वामी, मिताली राज, शिखर धवन, रोहित शर्मा हे प्रत्येकी १ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झालेत. बांगलादेशविरुद्ध T20I मध्ये पहिल्याच चेंडूवर होणारी ती पहिलीच भारतीय कर्णधार ( पुरुष व महिला/ सीनियर व ज्युनियर) ठरली आहे.

(हेही वाचा Love Jihad : ‘ती’ दहशतवादी तारिकाला लव्ह जिहादचे प्रशिक्षण द्यायची; उत्तर प्रदेश पोलिसांनी केला पर्दाफाश )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.