२०११ नंतर जनगणना न झाल्याने भारताची लोकसंख्या नेमकी किती याची ठोस माहिती उपलब्ध नाही. पण घटलेला मृत्यूदर आणि वाढलेले आयुर्मान यामुळे भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. त्यामुळे भारतात वृद्धांची संख्याही वाढणार अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे देशाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार, जाणून घेऊया.
भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या सुमारे ४० टक्के आहे. तर देशात सुमारे निम्म्या लोकसंख्येचं वय हे २५ ते ६४ वर्षे दरम्यान आहे. भारतात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींची संख्या केवळ ७ टक्के आहे. भारतातील लोकसंख्या वृद्धी दर कमी होत असल्याने त्याबाबत चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत वयोवृद्ध लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार भारताचे सरासरी वय २८ वर्ष आहे. पुढील ३० वर्षांत वयोवृद्ध लोकांची संख्य़ा वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षांत वृद्धांची संख्या वाढत जाईल. वृद्धांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी काही सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतील.
Join Our WhatsApp Community