म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीच्या शेवटच्या दिवशी १,४५,८४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १,१९,२७८ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १९४७ सदनिकांसाठी २३७७६ अर्जदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अनामत रकम भरण्यास काही तास शिल्लक असल्याने रक्कम भरणाऱ्या अर्जदारांनी संख्या वाढली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत ११ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता संपुष्टात आली आहे परंतु अर्जदार अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा रात्री ११.५९ पर्यंत करू शकणार आहेत. तसेच RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतील. १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत ४०८२ सदनिकांच्या विक्रीसाठी २२, मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ११ जुलै रोजी संध्याकाळी अर्ज सादर करण्याची लिंक संपुष्टात येईपर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांकरीता ३५,२३१ अर्ज प्राप्त झाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांकरीता ७३,४१४ अर्ज प्राप्त झाले आहेत, मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांकरीता १०,५०० अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २९२८ अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत १९४७ सदनिकांसाठी २३७७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Indian Population : भारत म्हातारा होतोय? काय सांगते लोकसंख्येची आकडेवारी?)
उत्पन्न गटासाठी अशाप्रकारे नोंदणी झाले अर्ज
अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांकरीता ३५,२३१ अर्ज
अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांकरीता ७३,४१४ अर्ज
मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांकरीता १०,५०० अर्ज
उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २९२८ अर्ज
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत १९४७ सदनिकांसाठी २३७७६ अर्ज
हेही पहा –
Join Our WhatsApp Community