IND vs BAN 2nd T20I : बांगलादेशला भारताच्या लेकींचे जशास तसे उत्तर; 87 धावांत खेळ आटोपला 

122

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा अवघ्या 8 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने बाजी मारली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला होता. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 95 धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना बांगलादेश महिला संघ जिंकणार असे वाटले, पण दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचा संघ 87 धावांत गारद झाला.

लो स्कोरिंग सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या तर मिन्नू मणी हिने 2 विकेट घेण्याचा पराक्रम केला. भारताने दिलेल्या 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सुल्ताना अवघ्या पाच धावा काढून तंबूत परतली..तिला फक्त चार चेंडूंचा सामना करता आला. त्यानंतर मुर्शिदा खातून हिने 15 चेंडूचा सामना करताना फक्त चार धावा केल्या. रितु मोनी हिने 6 चेंडूत 4 धावा केल्या. शोरना अख्तर हिने 17 चेंडूत सात धावा केल्या. कर्णधार निगर सुल्ताना हिने एकाकी झुंज गिली. सुल्ताना हिने 38 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. 55 चेंडूचा सामना करताना दोन चौकारांच्या मदतीने तीने 38 धावांची खेळी केली. दिप्ती शर्मा हिने बांगलादेशची कर्णधार तुल्तानाला बाद केले. फहिमा खातून आणि मारूफा अख्तर यांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी भेदक मारा केला. दिप्तीने चार षटकार 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. शेफालीने 3 षटकात 15 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. &nbspमिन्नू मणी हिने 4 षटकात 9 धावांच्या मोबद्लयात दोन विकेट घेतल्या.. अनुषा हिने 4 षटकात 20 धावा देत एक विकेट घेतली. पूजा वस्त्राकर हिने एका षटकात 10 विकेठ खर्च केल्या पण एकही विकेट मिळाली नाही.

(हेही वाचा IND vs BAN 2nd T20I : बांगलादेश विरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ शंभरच्या आत गुंडाळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.