‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांची महाराष्ट्र शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७ प्रतिष्ठित माध्यम समुहातील ज्येष्ठ पत्रकारांचा या समितीत समावेश आहे.
राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास, त्यांना किंवा त्यांच्या कुटूंबांना मदत करण्याच्या उद्देशाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या नावाने कल्याण निधीची स्थापना करण्यात आली आहे. या निधीच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या विश्वस्त संस्थेच्या कार्यकारी मंडळावर स्वप्नील सावरकर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ जुलै रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या समितीतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची मुदत ३ वर्षे इतकी राहणार आहे.
(हेही वाचा Muslim : झारखंडपाठोपाठ आता कर्नाटक विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोलीची मागणी )
समितीवरील शासकीय सदस्य
- १) प्रधान सचिव/सचिव, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई – अध्यक्ष
- २) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई – सदस्य
- ३) संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई – सदस्य सचिव
- ४) उपसंचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई – खजिनदार
- ५) सहसचिव/उप सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई – सदस्य
समितीवरील अशासकीय सदस्य
- १) नरेंद्र कोठेकर – संपादक, दैनिक नवराष्ट्र
- २) राजा माने – ज्येष्ठ पत्रकार
- ३) मनीषा रेगे – प्रतिनिधी, पीटीआय (वृत्तसंस्था)
- ४) विजय बाविस्कर – मुख्य संपादक, लोकमत
- ५) गजानन निमदेव – संपादक, तरुण भारत
- ६) कैलास म्हापदी – संपादक, जनादेश
- ७) स्वप्नील सावरकर – संपादक, हिंदुस्थान पोस्ट