मुंबईत साथीच्या (Epidemic) आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत असून या महिन्यातील मागील आठ दिवसांतच डेंग्यूचे १५६ आणि गॅस्ट्रोच्या ४७४ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, मागील काही वर्षांत या रुग्णांची नोंदणी आरोग्य केंद्रातील २२ नोंदणी केंद्रातून होत होती, परंतु आता ही नोंद ८८० नोंदणी केंद्रांवरून घेतली जात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या अधिक वाढलेली दिसून येत असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
महानगरपालिकेने पावसाळाजन्य आजारांशी संबंधित आढळून येणारी सर्व रुग्णसंख्या नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वर्ष २०२३ मध्ये नोंदवलेली रुग्णसंख्या अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आरोग्य यंत्रणेतील नोंदणी केंद्रांची संख्या २२ वरून ८८० इतकी झाली आहे. या केंद्रांमध्ये महानगरपालिकेचे दवाखाने, महानगरपालिकेची रूग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अतिरिक्त खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रुग्णालये यांचाही समावेश असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
जुलै २०२२ मध्ये हिवताप अर्थात मलेरियाचे ५६३ रुग्ण होते, तर जून २०२३ मध्ये ही रुग्ण संख्या ६७६ होती. तर १ ते ८ जुलै २०२३ या कालावधीत ही रुग्ण संख्या १५६ एवढी आहे.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ “विशेष नाणे” काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी : सुधीर मुनगंटीवार)
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तापाचे सर्वेक्षण (शीघ्र कृती दल आणि मलेरिया कर्मचाऱ्यांमार्फत) केले जाते. तसेच अधिक धोका असणाऱ्या परिसरांची शोधमोहीम व नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते. आरोग्य विभाग, कीटकनाशक विभाग आणि सर्वेक्षण कर्मचाऱ्यांमार्फत संयुक्त कार्यवाही केली जाते असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
– गृहभेटींमधून तापाच्या सर्वेक्षणाची मोहीम
सर्वेक्षण केलेली घर: ४ लाख ९८ हजार ७५०
सर्वेक्षण झालेली लोकसंख्या: २४ लाख ९३ हजार ७५०
उपचारासाठी संदर्भित केलेले रुग्ण: २ हजार २९४
हिवतापासाठी रक्त तपासणीसाठीचे रक्त नमुने: ३१ हजार रुग्ण
– कीटक नियंत्रण कार्यवाही अ) हिवताप (मलेरिया) नियंत्रण
भेटी देवून तपासणी केलेली घरे: ६ हजार ९५७
कीटक उत्पत्ती स्थानांचे सर्वेक्षण: २१ हजार ४०३ डासांच्या उत्पत्तीस्थाने शोध व नष्ट कार्यवाही: ६०५
– डेंगी नियंत्रण
तपासणी केलेल्या घरांची संख्या: ४ लाख १५ हजार ५००
तपासणी केलेले पंप : ४ लाख ४९ हजार ५५१ कंटेनर
डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध व त्यावर कार्यवाही : ४ हजार ६६०
– धूम्र फवारणी कार्यवाही
धुम्र फवारणी मशीनमध्ये औषधांचा केलेला भरणा: ६ हजार ४३२
धूम्र फवारणी केलेल्या परिसरांची संख्या: १६ हजार २५८
धुम्रफवारणी केलेल्या एकूण झोपड्या: २ लाख ३८ हजार ३९३
हेही पहा –
Join Our WhatsApp Community