Out Of Poverty : पंधरा वर्षांनंतर सकारात्मक चित्र; भारतातील ४१ कोटी नागरिक दारिद्रयातून बाहेर

176
Out Of Poverty : पंधरा वर्षांनंतर सकारात्मक चित्र; भारतातील ४१ कोटी नागरिक दारिद्रयातून बाहेर

जागतिक लोकसंख्येत चीनलाही मागे टाकणाऱ्या आपल्या भारत देशात गरीबीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, भारताने आता गरीबीवर (Out Of Poverty) मात करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालावरून भारताने गरिबीवर मात्र करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मागील १५ वर्षांमध्ये भारतातील ४१.५ कोटी नागरिक दारिद्रयातून बाहेर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवार ११ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २००५ – ०६ ते २०१९ – २१ या काळातील ही आकडेवारी आहे. भारताबरोबरच आणखी २५ देशांनी या काळात आपल्या गरीबी इंडेक्समध्ये सुधारणा घडवून आणली आहे. वैश्विक बहुआयामी गरीबी इंडेक्सने (Multidimensional Poverty Index) ही आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास मोहीम (OPHI) या संस्थांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – रेल्वे साखळी बॉम्बस्फोट : सतरा वर्ष पूर्ण होऊनही फाशीच्या शिक्षेवर अद्याप शिक्कामोर्तब नाही)

‘या’ देशांचाही समावेश

भारताप्रमाणेच गरिबी निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये चीन, कंबोडिया, काँगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा देखील समावेश आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने (UNDP) दिलेल्या माहितीनुसार २००० ते २०२२ पर्यंत वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा अहवाल समोर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एकूण ८१ देशांचा सहभाग होता. यामध्ये लोक त्यांचे दैनंदिन जीवन कसे जगत आहेत, शिक्षण आणि आरोग्याची उपलब्धता किती आहे. घर, पिण्याचे पाणी, वीज यासारख्या सुविधांवरही नजर ठेवण्यात आली होती.

‘या’ कालावधीमध्ये गरिबीची टक्केवारी होती १६.%

सन २००५-०६ मध्ये देशातील गरीबांची टक्केवारी ५५.१ टक्के होती, जी २०१९-२१ या कालावधीमध्ये केवळ १६.४ टक्के एवढी झाली. सन २००५-०६ मध्ये देशातील बहुआयामी गरीबांची संख्या ६४.५ कोटी होती. तर, २०१५ – १६ ही संख्या ३७ कोटींवर पोहोचली. त्यानंतर २०१९ – २१ पर्यंत ही संख्या केवळ २३ कोटींवर आली असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.