Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार

194

नागपूर समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचे प्राण गेले तर अनेक जखमी झाले आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार लवकरच समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांसोबत राज्य सरकारची चर्चा सुरु आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एखादी दुर्घटना घडल्यास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येणं शक्य होईल आणि जखमींना योग्य उपचार मिळतील. यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित हेलिकॉप्टर कंपन्यांशी करार करणार आहे. यापूर्वी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समृ्द्धी महामार्गालगत जवळपास १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असणार आहे, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात २५-२६ जणांचा मृत्यू झाला. या अपघात झाल्यानंतर जखमींना घटनास्थळी कोणतीच मदत न मिळाल्याचा दावा करण्यात आला होता.

(हेही वाचा Ajit Doval : 33 मुस्लिम देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम भारतात राहतात; अजित डोवालांचे सौदीच्या नेत्याला प्रत्यूत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.