झारखंड : ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत टिकली लावली म्हणून विद्यार्थीनीला मारहाण; मुलीची आत्महत्या

242
झारखंड : ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत टिकली लावली म्हणून विद्यार्थीनीला मारहाण; मुलीची आत्महत्या

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील तेतुलमारी येथे सेंट झेव्हियर्स कॉन्व्हेंटमध्ये सोमवारी (१० जुलै) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या शाळेच्या इयत्ता दहावी मधील एका विद्यार्थीनीने कपाळाला टिकली लावली म्हणून तिला तिच्या शिक्षीकेने संपूर्ण शाळेसमोर मारहाण केली. या मानसिक धक्क्यामुळे पिडीत विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

शाळा ख्रिश्चन मिशनरीज द्वारे संचालित

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थीनी धनबाद जिल्ह्यातील तेतुलमारी इथल्या सेंट झेव्हियर्स शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. ही विद्यार्थीनी सोमवारी १० जुलै रोजी शाळेत कपाळाला टिकली लावून गेली होती. सेंट झेव्हियर्स शाळा ख्रिश्चन मिशनरीज द्वारे संचालित होत असल्याने या शाळेत स्थानिक आदिवासी परंपरा आणि हिंदू धर्माची धार्मिक चिन्हे वापरण्यास विद्यार्थ्यांना मनाई आहे. त्यामुळे पिडीत विद्यार्थीनीने टिकली लावल्याने शाळेतील शिक्षकांचा संताप झाला. शाळेतील शिक्षीकेने टिकली लावल्याबद्दल सदर विद्यार्थीनीला प्रार्थनेच्या वेळी संपूर्ण शाळेसमोर मारहाण करून अपमानित केले. या घटनेचा सदर विद्यार्थीनीच्या मनावर गंभीर परिणाम झाला. या घटनेनंतर त्या विद्यार्थीनीने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. पिडीत विद्यार्थीनीने मृत्यूपूर्वी लिहीलेल्या पत्रात सदर घटनेचा उल्लेख करून तिला अपमानित करणाऱ्या शिक्षकांचे नाव नमूद केले आहे.

(हेही वाचा –  ‘जीएसटी’ काऊन्सील बैठक : ऑनलाईन-गेमिंग’ महागणार तर ‘या’ गोष्टी होणार स्वस्त)

विद्यार्थीनीचा मृतदेह शाळेसमोर ठेवून आंदोलन

पिडीतेच्या आत्महत्येनंतर मंगळवारी ११ जुलै रोजी मृत मुलीच्या पालकांनी आणि स्थानिकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली, त्यानंतर पोलिसांना तपास आणि कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी मृतक विद्यार्थीनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवर आरोपी शिक्षीका आणि मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करवून घेण्यासाठी पिडीत कुटुंबाला विद्यार्थीनीचा मृतदेह शाळेसमोर ठेवून आंदोलन करावे लागले होते.

आरोपीला अटक

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे (एनसीपीसीआर) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मंगळवारी ट्विट करत सांगितले की, ‘टिकली’ लावून शाळेत गेल्यामुळे एका विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याची नोंद आहे. एनसीपीसीआरने या प्रकरणाची दखल घेतली असून, त्यांची टीम तपासासाठी धनबादला जाणार आहे. तर बालकल्याण समिती (सीडब्ल्यूसी), धनबाद, झारखंडचे अध्यक्ष उत्तम मुखर्जी म्हणाले की, सेंट झेव्हियर्स शाळेतील घटना अतिशय गंभीर आहे. ही शाळा देखील सीबीएसई बोर्डाशी संलग्न नाही. मी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मी आज पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.