मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आता प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून सध्या उध्दव ठाकरे यांच्यासोबत पक्षात निष्ठा व्यक्त करणारेही अचानक शिंदे गटात दिसले जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेकांची यादी तयार असून केवळ शिंदे यांना वेळ नसल्याने तसेच मोठ्या संख्येने प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर पडले असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रवेश करत असतानाच आता खुद्द विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर काठावर असलेल्या उध्दव ठाकरे गटातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची एक मोठी यादी तयार असून लवकर ही सर्व मंडळी पक्षात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळत आहे. अंधेरी पूर्व येथील उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदानंद परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परब हे आमदार रवींद्र वायकर यांच्या अगदी जवळ होते.
(हेही वाचा – माफक दरातील ‘या’ सुविधांमुळे एसटीच्या “जन-शिवनेरी” ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची एक मोठी यादी तयार असून पक्षात मोठ्याप्रमाणात प्रवेश दाखवण्यासाठी एकेक पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधींना समर्थकांसह प्रवेश देण्याऐवजी एकत्र मोठ्या संख्येने प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतील प्रवेश काही लांबणीवर पडले असले तरी भविष्यात प्रवेश करणाऱ्यांचा मोठा आकडा दिसेल असेही बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उध्दव ठाकरे गटातील अनेक असे चेहरे आहेत, जे आज जाहीरपणे निष्ठा व्यक्त करत शिंदे गटावर आरोप करत आहेत. ते सर्व चेहरे लवकरच शिवसेनेत दिसतील. त्यामुळे ही मंडळी जेव्हा शिवसेनेत प्रवेश करतील तेव्हा अनेकांना धक्काही बसेल, असेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community