Khalistani : सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर खलिस्तानी हल्ला; NIAचे पथक अमेरिकेला जाणार

205

सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी हल्ल्याप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार आहे. 17 जुलैनंतर NIAची टीम पाच दिवसांसाठी सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. गृहमंत्रालयाने NIA ला अमेरिकेत जाण्याची परवानगी दिली आहे.

NIAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलैनंतर एनआयएची पाच सदस्यीय टीम अमेरिका सॅन फ्रान्सिस्कोला जाईल, जिथे NIA वाणिज्य दूतावासातील हल्ल्याची चौकशी करेल. काही दिवस अगोदर, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाच्या तपासावर NIAने गुन्हाही नोंदवला आहे. यासोबतच कॅनडातील भारतीय दूतावासावर शीख फॉर जस्टिस आणि इतर संघटनांनी केलेल्या हल्ल्याचा तपासही NIAने ताब्यात घेतला आहे. या दोन्ही हल्ल्यांचा तपास गृह मंत्रालयाने NIAकडे सोपवला होता.

2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील वाणिज्य दूतावास जाळण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाचीही एनआयए चौकशी करणार असल्याचे मानले जात आहे. या सगळ्यामागचा हेतू असा आहे की, खलिस्तानी संघटना आयएसआयच्या सांगण्यावरून भारतीय दूतावास आणि तेथील अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही त्यांना लगाम घालण्याची पूर्ण तयारी केली आहे.

(हेही वाचा ‘जीएसटी’ काऊन्सील बैठक : ऑनलाईन-गेमिंग’ महागणार तर ‘या’ गोष्टी होणार स्वस्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.