Russia : रशियाच्या राष्ट्रपतींच्या ट्रेनमध्ये आहेत सर्व सुखसुविधा…

194

लंडनमध्ये असलेल्या डॉजियर्स सेंटर नावाच्या एका रशियन रिसर्च समूहाला रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या या लक्झरी ट्रेनविषयीची कागदपत्रे ‘जिरकोन सर्व्हिस’ नावाच्या एका रशियन कंपनीच्या अंतर्गत सूत्रांकडून लीक झालेली सापडली. या कागदपत्रांमध्ये पुतीन यांच्या लक्झरी ट्रेनविषयी माहिती असलेले एक पत्रसुद्धा सापडले आहे. हे पत्र रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या विशेष अधिकाऱ्यांकडून देशाच्या परिवहन प्रधासनाला पाठवण्यात आले होते. या पत्रामध्ये ट्रेनमध्ये हव्या असणाऱ्या सर्व सुखसोयींविषयी सविस्तर माहिती लिहिलेली आहे. जसे की, जिम, रॉयल स्पा, स्पोर्ट्स एरिया, मसाज पार्लर, आतले फर्निचर डायनिंग रूम, बेडरूम्स, इत्यादी.

आतापर्यंत या ट्रेनमधील सुविधांची फारशी माहिती समोर आली नव्हती. पण आता याबाबतीत असलेली सगळी माहिती बाहेर पडली आहे. यामध्ये ट्रेनच्या आतील भव्य इंटिरिअर, जिम, स्पा, बेडरूम्स, डायनिंग रूम्स, यांचे फोटो समोर आले आहेत. तसेच या ट्रेनमध्ये सुरक्षा व्यवस्थाही सुजज्ज आहे. यात अनेक प्रकारची विविध हत्यारे ठेवली आहेत. तसेच ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या बुलेटप्रूफ आहेत. ट्रेनच्या एका विशिष्ट खोलीमध्ये कॉस्मेटोलॉजी सेंटर आहे. येथे एक मसाज टेबल आणि विविध प्रकारची सौंदर्य उपकरणे आहेत. त्यामध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनसुद्धा आहे. या मशीनचा उपयोग त्वचा कोमल राखण्यासाठी केला जातो. ट्रेनच्या शेवटच्या भागात टाईल्स लावलेले बाथरूम तसेच टर्किश बाथ आणि शॉवरसुद्धा आहे.

याव्यतिरिक्त या ट्रेनमध्ये एक चित्रपटगृह आणि एक डीझल पॉवरने सुसज्ज असलेली कारसुद्धा आहे. या ट्रेनची किंमत सहाशे नऊ कोटी रुपये आहे असं म्हटलं जातंय. तर अशी ही सर्व सुखसोयींनी सुसज्ज असलेली ट्रेन रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना देशांतर्गत सुखकरपणे प्रवास करता यावा यासाठी खास तयार केली गेली होती. या ट्रेनबद्दलची आणखी माहिती आणि फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता.

(हेही वाचा Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला; महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.