आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत. स्मार्टफोन तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या परदेशातल्या म्हणजेच भारताबाहेरच्या आहेत. पण आपला भारतसुद्धा या स्पर्धेत मागे राहिलेला नाही. तुम्हाला LAVA नावाचा स्मार्टफोन आठवतच असेल. हा फोन मेड इन इंडिया म्हणजेच भारतात तयार केला गेलेला आहे.
या LAVA कंपनीने आता आणखी एक LAVA Agni 2 नावाचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने मार्केटमध्ये येताच खळबळ माजवली आहे. फारच कमी वेळात या स्मार्टफोनने लोकप्रियता मिळवलेली आहे. या फोनमध्ये असलेल्या सर्व फीचर्सविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
LAVA Agni 2 या स्मार्टफोनमध्ये 3D ड्युअल कर्व्ह्ड डिझाईन आली आहे. ही डिझाईन लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. तसेच यात 6.78 इंचाचा FHD+Amoled डिस्प्ले आहे याच्या कर्व्ह्ड डिझाईनमुळे हा फोन युनिक आणि प्रिमियम दिसत आहे. तसेच 6.78 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेमुळे याच्या युजर्सना वेगळाच आनंद अनुभवायला मिळत आहे. यावर मुव्ही पाहण्याची आणि गेम्स खेळण्याची खूप मजा युजर्स घेत आहेत.
Lava च्या या स्मार्टफोनमध्ये पहिल्यांदाच डायमेंसिटी 7050 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. त्यामुळे युजर्स गेमिंग तसेच मल्टिटास्किंग सारख्या कामांचा वेगळा अनुभव घेत आहेत. तसेच LAVA Agni 2 हा स्मार्टफोन वापरताना युजर्सना 5G नेटवर्कचा आनंद लुटता यावा यासाठी या फोनमध्ये 13 5G बँड्सचा सपोर्ट दिला गेला आहे. जेणेकरून युजर्स हायस्पीड इंटरनेट वापरू शकतात. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 50mp चा रिअर कॅमेरा सेटअप, लेन्स 1.0 मायक्रॉन पिक्सल सेन्सर आहे. ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम लाईट ऑब्जर्व्हिंग कपॅसिटी मिळते. ज्यामुळे तुमचे फोटो आणखी क्लिअर येऊ शकतात. तसेच या फोनमध्ये 16 mp चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.
Join Our WhatsApp Community