MMR region : पंतप्रधान आवास योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ६ लाख रुपये

190
MMR region : पंतप्रधान आवास योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ६ लाख रुपये
MMR region : पंतप्रधान आवास योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ६ लाख रुपये

पंतप्रधान आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात (MMR region) आर्थिक कमकुवत घटकांकरिता उत्पन्नाचा निकष आता ३ लाख रुपयांवरुन ६ लाख रुपये करण्यात आला आहे. त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश काढला आहे. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाचे निकष ३ लाखांऐवजी ६ लाख रुपये करण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने २१ जून २०२३ रोजी एक पत्र पाठवून केली होती.

(हेही वाचा – इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना UAPA अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा)

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी संपर्क करुन त्यांना यासंदर्भात विनंती केली होती. केंद्र सरकारने बुधवारी (१२ जुलै) रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.