टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७०० विकेट घेत सर्वाधिक गोलंदाजी करणारा ९६ वा भारतीय ठरला आहे. एवढेच नाही तर त्याने अनिल कुंबळेचा विक्रमही मोडला आहे. एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनने जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.
अश्विनने डेल स्टेनला टाकले मागे
रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात ५ बळी घेतले. त्याच्या नावावर ७०२ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (६९९ बळी) मागे टाकले. ७०० हून अधिक बळी घेणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्याआधी फक्त अनिल कुंबळे (९५६ विकेट) आणि हरभजन सिंग (७११ विकेट) हेच ही कामगिरी करू शकले आहेत.
पिता-पुत्राची विकेट घेणारा पहिला भारतीय
रविचंद्रन अश्विन कसोटीत पिता-पुत्राची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंदरपॉलचा बळी घेत ही कामगिरी केली. अश्विनने २०११ मध्ये तेजनारायणचे वडील शिवनारायण चंदरपॉल यांचीही विकेट घेतली होती. २०११ मध्ये त्याने नवी दिल्लीत झालेल्या कसोटीत शिवनारायणला एलबीडब्ल्यू केले होते.
Join Our WhatsApp Community