Indian Economy : भारताला होणार २० हजार कोटींचा नफा; कोणत्या निर्णयाचा होणार परिणाम? 

180

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत टॅक्ससंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर, केंद्र सरकारला तब्बल 20,000 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय, सरकारने काही उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णयही घेतला होता. यासंदर्भात बोलताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले, ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के टॅक्स लावण्यासंदर्भात GST परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत वार्षाला 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होईल.

जीएसटी परिषदेने मंगळवारी सर्वसंमतीने ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कसीनो आणि घोड्यांच्या शर्यतींवर 28 टक्के दराने टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल सचिव मल्होत्रा म्हणाले, ऑनलाइन गेमिंग उद्योग सध्या केवळ 2 ते 3 टक्के एवढाच जीएसटी देत आहे. जो खाण्या-पाण्याच्या वस्तूंवर लागणाऱ्या पाच टक्के जीएसटीपेक्षाही कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारला अशा उद्योगांमधून केवळा 1,700 कोटी रुपयांचाच जीएसटी मिळाला. जर संपूर्ण मूल्यावर कर लादला गेला असता तर हे करसंकलन सुमारे 15,000 ते 20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते. आमचा अंदाज आहे की, हे संकलन आहे त्यापेक्षा 8 ते 10 पट व्हायला हवे. जर प्रमाण कायम राहीले, तर आपण यापासून वर्षाला 15,000 ते 20,000 कोटी रुपये जमा करू शकतो.

(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.