सी.एस.एम.टी. मडगावला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मछिंद्रा पवार यांना जेवत असताना जेवणात माणसाचे नख सापडले आणि या बातमीने सोशल मीडियावर खळबळ माजवली. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२७ जून रोजी लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे हिमांशू मुखर्जी म्हणाले की, अनेकांना डाळ आणि पनीर करी “बेचव” वाटली. त्यांचे सहप्रवासी मच्छिंद्र पवार, ज्यांना फूड पॅकेटमध्ये मानवी नख सापडले होते.
मुंबई-गोवा ट्रेनमधील खराब सेवा आणि जेवणाच्या दर्जाबाबत अनेक प्रवाशांनी ट्विटही केले. आयआरसीटीसीच्या सूत्रांनी सांगितले की, कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरवर दंडाव्यतिरिक्त, अशा घटना टाळण्यासाठी काही प्रोटोकॉलही ठेवण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, एक अधिकारी आता जेवणाचे ऑन बोर्ड मॉनिटरिंग करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करेल. IRCTC ने रत्नागिरी येथील बेस किचनमध्ये देखरेख देखील कडक केली आहे जिथून रात्रीचे जेवण ट्रेनमध्ये लोड केले जाते.
(हेही वाचा chatgpt शी स्पर्धा करणार एलॉन मस्कने लॉन्च केला ‘हा’ नवा स्टार्टअप)
Join Our WhatsApp Community