भारताने मिशन चांद्रयान-३ शुक्रवारी (१४ जुलै) लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २.३५ वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M४ द्वारे ते अवकाशात पाठवले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये उपस्थित होते. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरेल.
सुमारे ४० दिवसांनंतर म्हणजेच २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही १४ दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, चंद्रावरच्या पृष्ठभागावरच्या माती आणि धूळीचा अभ्यास केला जाईल.
(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा; म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत…)
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या बजेटपेक्षाही चांद्रयान-३ स्वस्त
चांद्रयान-३ चे बजेट सुमारे ६१५ कोटी रुपये आहे तर अलीकडील आदिपुरुष चित्रपटाचे बजेट ७०० कोटी रुपये होते. म्हणजे चांद्रयान-३ हे चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षा ८५ कोटी रुपये स्वस्त आहे. ४ वर्षांपूर्वी पाठवलेल्या चांद्रयान २ चा खर्चही ६०३ कोटी रुपये होता. मात्र, त्याच्या लॉन्चिंगसाठी ३७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community