मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी (१४ जुलै) आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. सुरज नावाच्या नर जातीच्या चित्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या तेजस या नर चित्त्याचा तीन दिवसांपूर्वी उद्यानात मृत्यू झाला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षण पथकाला शुक्रवारी सकाळच्या सुमारास पालपूर पूर्व रेंजमधील मसावनी भागात सूरज चित्ता जखमी अवस्थेत दिसून आला. जमिनीवर पडलेल्या सूरजच्या मानेवर किडे पडले होते. अशा अवस्थेत तो उठून पळू लागला.
(हेही वाचा – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली महापालिकेच्या कामगारांच्या नियुक्तीचा आढावा)
पाठ आणि मानेवरही जखमा
पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वन अधिकार्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुक्त क्षेत्रात बिबट्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असून त्याच्या पाठीवर आणि मानेवर जखमेच्या खुणा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community