टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी खुशखबर; वीज दरात २५ ते ३५ टक्क्यांची कपात

218
टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी खुशखबर; वीज दरात २५ ते ३५ टक्क्यांची कपात
टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी खुशखबर; वीज दरात २५ ते ३५ टक्क्यांची कपात

विजेची मागणी सातत्याने वाढत असली तरी, भरमसाठ बिलांमुळे ग्राहक चिंतेत आहेत. अशावेळी टाटा पॉवरने वीज दरात २५ ते ३५ टक्क्यांची कपात करीत ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मान्यता दिलेल्या एमटीआर फ्रेमवर्कवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग्याच्या सुधारित टॅरिफ शेड्युलला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती टाटा पॉवरने केली होती. अपीलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने (एपीटीईएल) ती शुक्रवारी मान्य केली.त्यामुळे टाटा पॉवरचा वीज दर २५ ते ३५ टक्क्यांनी कमी होणार आहे. त्याचा लाभ तब्बल ७.५ लाख ग्राहकांना होणार आहे.

(हेही वाचा – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली महापालिकेच्या कामगारांच्या नियुक्तीचा आढावा)

अंतरिम काळात कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे ३१ मार्च २०२० रोजी प्रस्तावित केलेले दर पुन्हा लागू होतील. हे दर सध्याच्या दरांपेक्षा २५ ते ३५ टक्क्यांनी कमी आहेत, अशी माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.