डॉमिनिका कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव करून भारताने केवळ आपले खातेच उघडले नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिले स्थानही मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारताने नंबर-1वर कब्जा केला आहे,
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने आपला डाव 421 धावांवर घोषित केला होता. पहिल्या डावानंतर टीम इंडियाकडे 271 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ 130 धावांत गारद झाला.
यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात १७१ धावांची दमदार खेळी केली. तसेच कर्णधार रोहित शर्मानेही शतकी खेळी केली.
(हेही वाचा – चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक)
भारताचा 421 धावांवर डाव घोषित –
भारताचा कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी 421 धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडे 271 धावांची आघाडी होती.
यशस्वी जयस्वाल याने पदार्पणातच 171 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वीने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. तर रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दहा षटकार लगावले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागिदारी केली.
भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.
How good were these two in Dominica! 👏 👏#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/4D5LYcCmxB
— BCCI (@BCCI) July 15, 2023
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारताची गुणांची टक्केवारी 100 आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलियाची 61.11 आणि इंग्लंडची 27.78 आहे. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अॅशेसमध्ये प्रत्येकी दोन गुण गमावले, ज्यामुळे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवरही परिणाम झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community