अटक टाळण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली २५ लाखांची लाच

268
अटक टाळण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली २५ लाखांची लाच
अटक टाळण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली २५ लाखांची लाच

मुलुंड येथील मनपा अग्रवाल रुग्णालय प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी संशयित आरोपीकडे २५ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुलुंड पोलीस ठाण्यात केली आहे.

भूषण दायमा आणि रमेश बतकळस असे अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक आणि पोलीस हवालदार यांची नावे आहे. मुलुंड पश्चिम येथील मनपाचे एम. टी. अग्रवाल रुग्णालयात चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत बोगस डॉक्टरांचा पुरवठा करण्यात आल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी काही बोगस डॉक्टरांना अटक केली होती, या गुन्ह्यात चॅरिटेबल ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यांची नावे होती. हे पदाधिकारी अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले होते.

(हेही वाचा – खाते वाटपाच्या आटापाट्यात क्रीडा विभागाच्या ‘त्या’ जीआरला खो!)

न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्ष भूषण दायमा यांनी अटक टाळण्यासाठी संशयित आरोपी यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती, तडजोडीअंती ही रक्कम ११ लाख रुपयांवर करण्यात आली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल होताच, अर्जाची दखल घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून लाचेचा पहिला हप्ता २ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलीस निरीक्षक दायमा आणि हवालदार बतकळस यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.