सध्या अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. मात्र राजकारण आणि नातेसंबंध वेगवेगळे आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. कारण शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या तब्येत बिघडली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओक येथे गेले.
शुक्रवारी, १४ जुलै रोजी अजित पवार रात्री अचानक शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा झाली. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, काकींचं शुक्रवारी, १५ जुलै रोजी एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं. माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो, असे पवार म्हणाले. आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली.
(हेही वाचा चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक)
Join Our WhatsApp Community