वंदना बर्वे
भारतीय जनता पक्षाने लोजपा (रामविलास) प्रमुख चिराग पासवान आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांना रालोआत सामील होण्याचे औपचारिक आमंत्रण पाठवले आहे. येत्या १८ जुलै रोजी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक होणार असून आपण त्यात उपस्थित रहावे, असे निमंत्रण भाजपने पाठविले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यालयातून चिराग पासवान आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना निमंत्रण पाठविण्यात आली आहेत. भाजपने या पत्राच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना रालोआत सामील होण्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे.
सूत्रानुसार, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) महत्त्वाचे मित्र पक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारचे घटक आहात. देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या या प्रवासात आपण सरकारच्या पाठिशी राहिलीा आहात, असे पत्रात नमूद केले आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने गेल्या नउ वर्षात देशाच्या बहुआयामी विकासाला नवी उंची दिली आहे. एनडीए सरकारमध्ये गरीब कल्याण, सांस्कृतिक अभिमानाची पुनर्स्थापना, आर्थिक प्रगती, देशाचे संरक्षण आणि सुरक्षा, परदेशात भारताची मजबूत प्रतिष्ठा यासह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामे झाली आहेत. एनडीए सरकारने गेल्या ९ वर्षात सेवा आणि सुशासनाचे खरे व्हिजन साकारले आहे.
(हेही वाचा – आमदार सरोज अहिरे यांचा अजित पवारांना पाठिंबा)
परिणामी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अमृतकालाचे इंडिया व्हिजन २०४७ लोकसहभाग आणि लोकांच्या विश्वासाने देशाच्या विकासाचा प्रवास पुढे नेत आहे. अशात रालोआची बैठक मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले आहे. या सभेसाठी आपणास हार्दिक निमंत्रित आहात. एनडीएचा महत्त्वाचा भागीदार म्हणून तुमची भूमिका आणि तुमचे सहकार्य केवळ युती मजबूत करत नाही तर देशाच्या विकासाचा प्रवासही सुनिश्चित करते.
केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग यांची जागा निश्चित झाली
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी रविवारी पटना येथे चिराग यांची भेट घेतली. नित्यानंद राय यांनी ही वैयक्तिक बैठक असल्याचे म्हटले आहे, तर एनडीएच्या पुढील बैठकीसाठी ते दिल्लीत येणार असल्याचेही बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात चिराग पासवान यांची जागा निश्चित झाली आहे, आता फक्त मंत्रालय निश्चित व्हायचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community