Online Fraud : मागवला ९० हजारांचा कॅमेरा, पण हातात आल्या बिया!; नेमका प्रकार काय?

176
Online Fraud : मागवला ९० हजारांचा कॅमेरा, पण हातात आल्या बिया!; नेमका प्रकार काय?

ऑनलाईन शॉपिग (Online Fraud) जितकं सोयीचं झालं आहे तेवढाच त्यामधील फसवणुकीच्या तक्रारी देखील वाढल्या आहात. अशीच एक घटना अरुण कुमार मेहेर यांच्यासोबत घडली आहे. अरुण कुमार मेहेर यांची अॅमेझॉन या ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक झाली आहे. मेहेर यांनी ५ जुलै रोजी अॅमेझॉनवरुन ९० हजार रुपये किंमतीची कॅमेरा लेन्स ऑर्डर केली होती, मात्र त्यांना लेन्सच्या ऐवजी राजगिऱ्याच्या बिया मिळाल्या. त्यामुळे मेहेर यांना चांगलाच धक्का बसला आहे. अरुण मेहेर यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.

अरुण कुमार मेहेर यांनी अॅमेझॉनवरून ९० हजार रुपये किंमतीची सिग्मा २४-७० f २.८ लेन्सची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी त्यांची ऑर्डर आली. मात्र जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. बॉक्स घरी पोहोचण्याआधीच उघडला गेला असल्याचा आरोप देखील मेहेर यांनी केला आहे.

(हेही वाचा – आमदार सरोज अहिरे यांचा अजित पवारांना पाठिंबा)

अॅमेझॉन आणि अॅपेरियो रिटेलद्वारे मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मेहेर यांनी केला असून ट्विटमध्ये त्यांनी लवकरात लवकर कॅमेरा लेन्स देण्याची मागणी केली आहे. अॅमेझॉन कंपनीने त्यांच्या या ट्विटला रिप्लाय करत या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती दिली आहे. तर अरुण कुमार मेहेर यांनी हे प्रकरण लवकरात लवकर सोडवा आणि मी ऑर्डर केलेली लेन्स मला पाठवा किंवा माझे पैसे परत करा अशी मागणी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.