Handpump : भारतात टॅलेंटची कमी नाही; साध्या हॅंडपम्पला बनवले ऑटोमॅटिक हॅंडपम्प

267

गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. सामान्य माणसंही आपापल्या गरजेनुसार वेगवेगळे लहानमोठे शोध लावत असतात. त्याला तडजोड असं म्हणतात. बऱ्याचदा असे प्रयोग कौतुक करण्यासारखे असतात. पण काही वेळेस असे आगळे वेगळे प्रयोग फसतातही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तडजोड केलेल्या प्रयोगाविषयी सांगणार आहोत. हा प्रयोग कौतुक करण्यासारखा आहे की फसलाय हे मात्र तुम्हीच ठरवा.

हल्ली इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतातल्या एका गावात माणसाने आपल्या सध्या हापसीला म्हणजेच हँडपम्पला मॉडिफाय करून ऑटोमॅटिक बनवलं आहे असं आपल्याला दिसतं.

(हेही वाचा Fake Newsसाठी नियमांमध्ये केलेली दुरुस्ती कठोर – उच्च न्यायालय)

आपल्या हँडपम्पला ऑटोमॅटिक करण्यासाठी या माणसाने सायकलच्या पॅडल आणि चेनचा वापर केला आहे. एक विजेचे बटन सुरू करताच हँडपम्प हात न लावता आपोआप सुरू होतो. या व्हिडिओला आतापर्यंत चोवीस लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार लाख पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

हा व्हिडीओ पाहून लोकांचे संमिश्र कमेंट्स येत आहेत. बऱ्याच जणांना या माणसाचं कौतुक वाटत आहे. पण बरेच लोक असंही म्हणत आहेत की, हे करण्यापेक्षा एक मोटर बसवून घ्यायची होती ना, तर काही जणांचे असे म्हणणे आहे की. यामुळे वीज वाया जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.