पावसाळ्याचे आगमन झाले की चाहूल लागते ती हिरव्यागार रानभाज्यांची. पावसाळा हा रानभाज्या उगवण्यासाठीचा योग्य काळ असतो. अशाच एका रानभाजीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या रानभाजीचे नाव झेटूनीची फुले होय.
पावसाळ्यात उगवणारी रानभाजी झेटूनीची फुले
अतिशय दुर्गम भागात काटेरी झुडूपांवर या भाजीची वेल पसरलेली असते. या वेलीवर लहान लहान फुलांचा गुच्छ असतो. ही फुले वेचून त्यांची अतिशय चवदार अशी भाजी बनवली जाते. पावसाळ्यात केवळ १५ ते २० एवढ्या अल्प दिवसच झेटूनीची फुले उपलब्ध असतात. पाऊस पडल्यानंतर २१ दिवसांनी या वेलींना बहर येतो आणि त्यावर ही फुले लगडतात. या फुलांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अतिशय दुर्मिळ असल्याने सहसा ही झेटूनीची फुले बाजारात उपलब्ध होत नाहीत.
(हेही वाचा चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक
पाऊस झाल्यानंतर २० दिवसांनी येतात फुले
पावसाळ्यात दरवर्षी पाऊस झाल्यानंतर २० ते २२ दिवसांनी ही फुले काटेरी झुडपांवर येतात. ही फुले घरी आणून याची चटणी आम्ही दरवर्षी खात असतो. अतिशय चवदार अशी चटणी या फुलांपासून बनते. याला बनवण्यासाठी फार जास्त साहित्य देखील लागत नाही. तेल, मीठ आणि तिखट अशा मोजक्याच साहित्यात झेटूनीच्या फुलांपासून चविष्ट अशी चटणी तयार होते असे विठ्ठल काळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community