रॉकेट सायन्समध्ये पुरुषांनी केलेले काम दाखवून देणाऱ्या ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र भारताच्या अंतराळ संशोधन मोहिमेत महिलाही मागे राहिल्या नाहीत. कारण ज्या चांद्रयान ३ मोहिमेचे इस्रोने यशस्वी ‘उड्डाण’ केले आहे, त्या इस्रोमध्ये महत्वाच्या पदे महिला सांभाळत.
सोनी-लीव ची नवीन वेब सिरीझ ‘रॉकेट बॉईज’ भारतीय पुरुषांच्या कर्तृत्वावर आणि एरोस्पेस संशोधनातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकते. मात्र आम्ही इस्त्रोच्या चांद्रयान – ३ मोहिमेत मुख्य पदे सांभाळणाऱ्या महिला शास्त्रज्ञांची माहिती देऊ. ज्यांचे कार्य आणि योगदान इस्रोचे विविध प्रकल्प बनवण्यात आहे.
अनुराधा टीके
अनुराधा टीके यांनी ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्त्रो) चे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केले आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले. GSAT-१२ आणि GSAT-१० या उपग्रहांच्या प्रक्षेपणा वेळी त्यांनी जवळून काम केले. अनुराधा यांनी विविध भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे आणि त्यांना इस्त्रोच्या टीमकडून पुरस्कार मिळाला आहे. अनुराधा टीके यांना ‘२०१२ ASI- इस्त्रो मेरिट पुरस्कार’ त्यांच्या कामासाठी आणि योगदानासाठी प्रदान करण्यात आला.
(हेही वाचा Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहीम होणार यशस्वी; कारण यानाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये?)
डॉ. रितू करिधल
डॉ. रितू करिधल श्रीवास्तव या भारताच्या मंगळयानाच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या आणि प्रकल्पादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या “रॉकेट वुमन” म्हणून ओळखल्या जाणार्या त्या एक एरोस्पेस अभियंता आहेत आणि २००७ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून त्यांना इस्त्रो यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे.
मुठय्या वनिता
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली अभियंता, मुठय्या वनिता यांनी इस्त्रोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली. जिथे त्यांनी हार्डवेअर चाचणी आणि विकासावर काम केले. त्यानंतर संस्थेच्या २०१३ मध्ये मंगळयान मोहिमेसह त्या अनेक प्रकल्पांचा भाग होत्या. इस्त्रोच्या चंद्रयान-२ या मोहिमेच्या त्या पहिल्या महिला प्रकल्प संचालक बनल्या होत्या. त्यांनी कार्टोसॅट-१, ओशनसॅट-२ आणि मेघा-ट्रॉपिक्ससह अनेक प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मौमिता दत्ता
मौमिता दत्ता यांनी मार्स ऑर्बिटर मिशनच्या विकासात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. माहितीनुसार, त्यांना मंगळासाठी मिथेन सेन्सर आणि संपूर्ण ऑप्टिकल सिस्टमच्या विकासासाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निवडण्यात आले होते. त्यांच्या या कार्यासाठी, त्यांना इस्त्रो टीम ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community